Savitribai Phule Information in Marathi | सावित्रीबाई फुले माहिती मराठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे, तर त्या एक उत्तम कवियीत्री, शिक्षिका आणि समाजसेविका होत्या. त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हटले जाते. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यात खूप मोठी कामगिरी बजावली. त्यांनी स्त्रीया आणि शुद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला आणि त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका देखील होत्या.
भारताच्या इतिहासातील अशी ही स्त्री म्हणजे या राष्ट्राच्या पहिल्या स्त्री -शिक्षिका, भारतातील सत्रीमुक्तीच्या आद्य स्त्री-प्रणेत्या ‘सावित्रीबाई फुले’ यांचे कार्य खरेच अतुलनीय आहे. समाजधुरीण म्हणून सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तीत्व आणि कार्य आज इतिहासात सर्वश्रुत असले तरी मराठी साहित्याला आद्य काव्यरचनेचे अभिजात लेणेही त्यांनी बहाल केले आहे.
म्हणूनच सावित्रीबाईंना क्रांतीज्योती म्हणूनही ओळखले जाते
सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र : Savitribai Phule Information in Marathi
| मूळ नाव | सावित्रीबाई जोतीराव फुले | ||||||||||||||||||||||||
| जनतेने दिलेले नाव | क्रांतीज्योती ज्ञानज्योती | ||||||||||||||||||||||||
| जन्म तारीख | ३ जानेवारी, इ.स. १८३१ | ||||||||||||||||||||||||
| जन्मस्थळ | नायगाव, सातारा, महाराष्ट्र | ||||||||||||||||||||||||
वडिलांचे नाव
मुद्देसावित्रीबाई फुले -अल्प परिचयमहात्मा जोतीबा फुले यांच्या पत्नी म्हणून सावित्रीबाई फुले महाराष्ट्राला परिचित आहेतच. तथापि, त्यांचा परिचय तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. समाजसुधारणेच्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांनी स्वकर्तृत्वाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ रोजी झाला. त्या नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत. नेवसे- पाटील यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते. साहजिकच सावित्रीबाईचे बालपण मोठ्या मजेत गेले. तथापि, त्या वेळच्या प्रथेप्रमाणे त्या लहान असतानाच घरच्या मंडळींनी त्यांच्यासाठी वरसंशोधनास प्रारंभ केला होता. सन १८४० मध्ये त्यांचे जोतीबा फुले यांच्याशी लग्न झाले त्या वेळी जोतीबा फुले यांचं वय तेरा वर्ष, तर सावित्रीबाई फुलेंचे वय नऊ वर्ष होते. सावित्रीबाई फुलेंनी महात्मा जोतिबा फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्यात त्यांना मनापासून साथ दिली. स्त्री- उद्धाराच्या कार्यात तर त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र Savitribai Phule Biography in Marathi सावित्रीबाई फुले भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्रातील कवी होत्या. वैशिष्ट्य म्हणजे, भारताची महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका मानली जाते. पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत तिने भारतातील महिलांचे हक्क सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानली जाते. फुले व त्यांचे पती या दोघांनी मिळून १८४८ मध्ये भिडे वाडा येथे पुण्यात प्रथम भारतीय मुलींच्या शाळेची स्थापना केली. जाती आणि लिंगावर आधारित लोकांमधील भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक दूर करण्यासाठी त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीची ती एक महत्त्वाची व्यक्ती आहे. समाजसेवी आणि शिक्षणतज्ज्ञ फुले एक विपुल साहित्यिक लेखिका होती. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला. सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र Savitribai Phule Short Biography in Marathi
|